इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड दौ-यावर असलेल्या राज ठाकरेंच्या ताफ्याला शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुपारीबाज म्हणत रस्त्यावर सुपा-या फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मनसेने इशारावजा धमकी दिल्यामुळे वातावरण चांगलेच चिखळले आहे.मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ताफा अडवणा-यांना सक्त ताकीद दिली आहे. संदीप देशपांडे म्हणाले की उबाठाला सगळ्या महराष्ट्र सैनिकांकडून सांगत आहे, सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार आहे.