इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उपमुख्यमंत्री अजित पवार जन सन्मान यात्रा मध्येच सोडून गुरुवारी रात्री तडकाफडकी मुंबईत दाखल झाले. मुंबईत पोहचल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. आचारसंहितेपूर्वी विकासकामांच्या पूर्ततेसाठी, राज्यसभेच्या जागा संदर्भात आणि इतर विषयावर बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नाशिक जिल्ह्यात अजित पवार यांचा चार दिवसांचा दौरा आहे. गुरुवारी सकाळी या जन सन्मान यात्रेला सुरुवात झाली. दिंडोरी मतदार संघातून यात्रा सुरु झाल्यानंतर महिलांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर रात्री देवळाली ही यात्रा गेली. त्यानंतर अजित पवार हे मुंबईला रवाना झाले आहे. त्यानंतर आज ते पुन्हा या यात्रेत सामील होतील.