नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रस्त्याच्या कडेला उभे राहून मोबाईलवर बोलणा-या महिलेच्या गळयातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना पेठरोडवरील आरटीओ कार्यालय भागात घडली. या घटनेत ३३ हजार रूपये किमतीची सोनसाखळी भामट्यांनी लांबविली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशा नारायण चौधरी (रा.शिसमर्थ नगर,आरटीओजवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चौधरी या मंगळवारी (दि.६) दुपारी आपल्या रो हाऊस समोरील कॉलनीरोडच्या कडेला उभ्या राहून मोबाईलवर बोलत असतांना ही घटना घडली.
पाठीमागून दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळय़ातील सुमारे ३३ हजार ३९० रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.