नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून निकाल लावून देतो म्हणून ३६ हजाराची लाच घेतांना जळगांव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळयात अडकले. त्यांच्याविरुध्द जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे माथाडी कामगार संघटनाचे उपाध्यक्ष व मुकादम असून तक्रारदार यांचे मित्र हे पण मुकदम होते व त्यांना मुकदम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. त्याबाबत सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी चालू होती. सुनावणीचा निकाल लावण्यासाठी मी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून निकाल लावून देतो मला ५० हजार रुपये द्यावे लागतील. त्याबाबत तक्रार यांनी लाप्रविभाग जळगाव येथे ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती .सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता
कामगार निरीक्षक यांनी पंचासमक्ष तडजोडअंती ३६ हजार रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-51 रा. जळगांव जि.जळगांव
आलोसे- चंद्रकांत पाटील वय 57, व्यवसाय नोकरी -कामगार निरीक्षक , नेमणून जळगांव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव ( वर्ग ३ )
*लाचेची मागणी- 50,000/- हजार रुपये
*लाच स्विकारली- 36,000/- रुपये
*हस्तगत रक्कम- 36,000/- रुपये
*लाचेची मागणी – दि.05/08/2024 दि.08/08/2024
*लाच स्विकारली – दि.08/08/2024
*लाचेचे कारण- यातील तक्रारदार हे माथाडी कामगार संघटनाचे उपाध्यक्ष व मुकादम असून तक्रारदार यांचे मित्र हे पण मुकदम होते व त्यांना मुकदम पदावरून स्थगिती देण्यात आली होती.त्याबाबत सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी चालू होती. सुनावणीचा निकाल लावण्यासाठी मी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून निकाल लावून देतो मला 50,000/- रुपये द्यावे लागतील. त्याबाबत तक्रार यांनी लाप्रविभाग जळगाव येथे दि.05/08/2024 रोजी तक्रार दिली होती .सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता
आलोसे यांनी पंचासमक्ष तडजोडअंती 36000/- रुपये स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा* व तपास अधिकारी
अमोल वालझाडे,पोलिस निरीक्षक ,ला.प्र.वि. जळगांव.
ॉसापळा पथक
पो.ना. बाळू मराठे , पो.ना. सुनिल वानखेडे, राकेश दुसाणे, पोना, किशोर महाजन
*कारवाई मदत पथक- एन. एन. जाधव, पोलीस निरीक्षक, स.फौ.सफौ दिनेशसिंग पाटील,
सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर,पो.कॉ. प्रदीप पोळ, पो. कॉ.प्रणेश ठाकुर,पो कॉ सचिन चाटे