नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जन सन्मान यात्रा आज नाशिक शहरात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काळाराम मंदिरास भेट देत प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.*
यावेळी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.