इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगर दौ-यावर असतांना आमदार बच्चू कडू यांनी समाज कल्याण अधिका-याच्या कानशिलात. यापूर्वी अधिका-यांना कडू यांच्या संतापाचा मार सहन करावा लागला आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिका-याला त्यांच्या रागाचा सामना करावा लागला.
हा संताप होण्याचे कारणही तसेच ठरले. दिव्यांग बांधवांना समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या ई- रिक्षांमध्ये एका दिवसांत बिघाड झाल्याची तक्रार घेऊन दिव्यांग बांधव आमदार कडू यांच्याकडे गेले होते. त्यावेळी आमदार कडू यांनी अधिका-यांची कानउघडणी केली. त्यानंतर एका अधिका-याला हलकीशी कानशिलात लगावली.