इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आज बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. ते आज बीड जिल्ह्यात आ.प्रकाश सोलंकी,जयदत्त क्षिरसागर, आ.संदिप क्षिरसागर, माजी आमदार अमरसिंग पंडित, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍड सुभाष राऊत यांची भेट घेणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता हॉटेल ‘रामा इंटरनॅशनल’ छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीड जिल्हयात हिंसक वळण लागले होते. आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर व अन्य नेत्यांच्या मालमत्ता जाळण्यात आल्या. माजलगाव नगरपालिकेचे कार्यालय जाळण्यात आले. बीड शहरातील बसस्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसची तोडफोड करण्यात आली. या सर्वच घटनेत सुमारे ११ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आतापर्यंत पोलिसांनी १४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व घटनेनंतर येथील तणाव आता निवळला आहे.