इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पॅरिस ऑलिम्पिंक स्पर्धेतून अपात्र ठरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आमची हरियाणाची शूर मुलगी विनेश फोगट हिने चमकदार कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. काही कारणांमुळे ती ऑलिम्पिक फायनल खेळू शकली नसली तरी ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे.
आमच्या सरकारने ठरवले आहे की विनेश फोगटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत केले जाईल आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याला दिले जाणारे सर्व सन्मान, बक्षिसे आणि सुविधा विनेश फोगटला कृतज्ञतापूर्वक दिल्या जातील.आम्हाला तुझा अभिमान आहे विनेश!
हरियाणा सरकारने सुवर्णपदक जिंकणा-या खेळाडूला ६ कोटी, रौप्यपदक जिंकणा-या विजेत्याला ४ कोटी तर सहभागी खेळाडूला १५ लाख देण्याची घोषणा अगोदरच केली आहे. त्याचप्रमाणे मेंडलनुसार सरकारी नोकरी देण्यात येणार आहे.