मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेंट जॅार्ज रुग्णालयातील कर्मचा-यालाच वेळवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. अनिस चव्हाण असे मृत कर्मचा-याचे नाव आहे. चव्हाण यांच्या डोक्याला अपघातात दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता या प्रकरणी दोन डॅाक्टरांचे निलंबन करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. याप्रकरणी गुरुवारी दुपारी विधीमंडळात बैठकही ते घेणार आहेत. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहे.
रुग्णालयातील कर्मचा-यालाच वेळवर उपचार न मिळाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मृताचे नातेवाईक आणि सहकारी कर्मचा-यांनी या घटनेनंतर डॅाक्टर आणि व्यवस्थापनाशी वाद घातल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलिस रुग्णालयात दाखल झाले होते.