नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रायगड जिल्ह्यातील महाड येथील एमआयडीमध्ये हेल्थकेअर कंपनीत स्फोट होऊन सात जणांचा होरपळून मृत्य घडल्याची घटना ताजी असतांना नाशिक येथून जवळ असलेल्या येथून जवळच असलेल्या नाशिक – पुणे रोडवरील शिंदेगाव एमआयडीसी मधील रंग बनवणा-या कंपनीला सायंकाळी सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठमोठे स्फोट झाले. दूर पर्यंत रंगाचे डब्बे उडत होते. या आगीतल लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
या कारखान्याला आग लागल्यानंतर जवळ असलेल्या बारदान काऱखान्यालाही आगीने घेरले. त्यामुळे दोन कारखान्याची आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी पोहचले आहे. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
ही घटना समजल्यानंतर नाशिकरोड पोलीस अपघातस्थळी पोहोचले आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आग कशामुळे लागली याचा शोध पोलिस व अग्नीशम दल घेत आहे.