नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वास्तव्यास राहून तब्बल तीन वर्षापासून गुंगारा देणा-या संशयितास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गुह्यात तो घटनेपासून पसार झाला होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्यास सातपूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
निलेश मगन गर्दे (२४ रा. शामव्हिला अपा.वृंदावननगर,जत्रा हॉटेल जवळ आडगाव) असे संशयिताचे नाव आहे. सातपूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. घटनेनंतर संशयित पसार झाला होता. युनिट २ चे हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तो पोलीसांच्या हाती लागला असून त्यास सातपूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय पगारे,हवालदार चंद्रकांत गवळी,नंदकुमार नांदुर्डीकर,प्रकाश बोडके,वाल्मिक चव्हाण,प्रविण वानखेडे,संजय पोटींदे आदींच्या पथकाने केली.









