नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ मध्ये नमूद केल्यानुसार वर्ष २०३० पर्यंत भारतातील ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहील,असा अंदाज आहे. हा अंदाज नीती आयोगाच्या अभ्यास आणि अहवालांच्या आधारे काढण्यात आला आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जुलै २०२० ते जून २०२१ या कालावधीत केलेल्या आवर्ती श्रम दल सर्वेक्षणामध्ये घरातील सदस्यांच्या स्थलांतर तपशीलांवर माहिती संकलित करण्यात आली आहे. ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) राव इंद्रजित सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.