नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नीट पीजी २०२४ (NEET-PG २०२४) परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा आरोप करणाऱ्या समाज माध्यमावरील पोस्ट काही माध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात आहेत.हे प्रसारण चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) च्या असे निदर्शनास आले आहे की, काही एजंट,टेलीग्राम मेसेंजर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे आणि बोगस दावे करत आहेत.हे समाजकंटक आगामी नीट-पीजी २०२४ परीक्षेसाठी,मोठ्या रकमेच्या मोबदल्यात या परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा दावा करत आहेत.
अशी फसवणूक करणारे, आणि नीट-पीजी २०२४ ची प्रश्नपत्रिका पुरविण्याच्या नावाखाली भरघोस रक्कम मागून नीट-पीजी च्या परीक्षार्थींची फसवणूक करणाऱ्यांचे साथीदार,यांच्या विरोधात NBEMS ने यापूर्वीच पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे, हे स्पष्ट करण्यात येत आहे. या सूचनेनुसार, NBEMS ने, “NEET-PG LEAKED MATERIAL” या टेलीग्राम चॅनेलद्वारे प्रसारित करण्यात आलेले असे खोटे दावे फेटाळून लावले आहेत, आणि नीट-पीजी 2024 च्या परीक्षार्थींनी या आगामी या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे खोटे दावे करून फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध रहावे, असा इशारा दिला आहे. सर्व उमेदवारांना खात्री दिली जात आहे की, नीट-पीजी २०२४ च्या प्रश्नपत्रिका NBEMS द्वारे अद्याप तयार करण्यात आलेल्या नाहीत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पेपर फुटीचे दावे बोगस आहेत.
पुढे असे सूचित केले जात आहे की,अशा कोणत्याही कृतीमध्ये अथवा तथ्यांची पडताळणी न करता अफवा प्रकाशित करणे /पसरवणे यामधील कोणाचाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग आढळून आला,तर NBEMS द्वारे योग्य ती कारवाई केली जाईल.
NBEMS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याची मदत/दावा करणाऱ्या अशा कोणत्याही एजंट/दलालाने फसव्या ईमेल/एसएमएस किंवा टेलिफोन कॉलद्वारे किंवा बनावट कागदपत्रांद्वारे किंवा वैयक्तिकरित्या किंवा सोशल मीडियाद्वारे, उमेदवारांशी संपर्क साधला, तर NBEMSच्या पुढील कम्युनिकेशन वेब पोर्टलवर,अथवा पुढील तपासाकरता स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवता येईल: