मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मालेगाव मधील माजी आमदार आसिफ रशीद शेख हे अजितदादा पवार यांच्या सोबत न जाता शरद पवार यांच्या सोबत राहून त्यांनी जिल्हा पदाधिकारी म्हणून काम सुरू केले. लोकसभेला त्यांनी धुळे-मालेगाव मतदार संघातून उमेदवारीची तयारी केली होती. मात्र महाविकास आघाडी कडून ही पारंपरिक काँग्रेसची जागा असल्याने काँग्रेसला सोडली. मात्र आगामी विधान सभे साठी सुद्धा ही जागा काँग्रेसची असल्याने ती महाविकास आघाडी काँग्रेससाठी मागण्यास आग्रही राहील हे लक्षात येताच. अस्वस्थ झालेले आसिफ शेख यांनी आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सर्वांनी मिळून अपक्ष निवडणूक लढवण्याची मागणी केली. तसे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या निर्णयाचे पत्र पाठवले. त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, आगामी विधानसभा निवडणूक माजी आमदार आसिफ शेख हे अपक्ष लढणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.