नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक दौऱ्यावर आलेल्या जपानच्या उद्योजकीय शिष्टमंडळाने नाशकात गुंतवणूक करण्याबाबत अंबड इंडस्ट्रीज अँड मनुफॅक्चरर्स असोसिएशन(आयमा)च्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयमा सभागृहात सविस्तर चर्चा केली. नाशकात गुंतवणुकीसाठी मोठा वाव आणि अनुकूल वातावरण असल्याचे आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी यावेळी संगितले.
चर्चेत जपानच्या शिष्टमंडळातील यामाशिथा सॅन, सोनाबे सॅन, समीर झाले, हर्षल देशपांडे तर आयमाचे अध्यक्ष ललित बूब,सरचिटणीस प्रमोद वाघ,बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे,उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे,निर्यात समिती चेअरमन रवींद्र महादेवकर,मनीष रावल,जगदीश पाटील, आदिंनी भाग घेतला. मान्यवरांचा यावेळी पुष्पगुछ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,
प्रारंभी आयमा अध्यक्ष ललित बूब यांनी उद्योग,व्यवसाय, रोजगार वाढीसाठी आयमा काय काम करते याची माहिती दिली. दिला. नाशकात मुबलक जागा आहे.गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे काम शासन करते.नाशिक शहर सर्व उद्योगांसाठी सर्व दृष्टीने योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. आयमा तर्फे २२ आणि २३ ऑगस्ट रोजी नाशकात बिझीनेस मीट -3चे आयोजन करण्यात आले असून त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून या असे आमंत्रणही जपानच्या शिष्टमंडळास देण्यात आले.
जपानचे उद्योजक यामाशिथा सॅन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक करारासंदर्भात माहिती दिली, महाराष्ट्र शासन व जपान त्याबाबत उद्योग व्यवसाय वाढीच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहेत व नाशिकमधील उद्योजकांना जपानमध्ये उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी यावे,असे आवाहन केले. तसेच जपानमध्ये होणाऱ्या एक्स्पोत नाशकातील जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभागी व्हावे असे निमंत्रणही त्यांनी आयमाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.आयमा सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी आभार मानले.