इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु असतांना अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.
सलील देशमुख यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन म्हटले आहे की,धन्यवाद, सुधीरभाऊ मुनगंटीवार! आपण काटोल तालुक्यातील केदारपुर येथे पर्यंटन विकासासाठी २ कोटी ३० लाख रुपये मंजुर केले. कटकारस्थान न करता, संकुचीत विचार न करता मोठ्या मनाने हा निधी आपण उपलब्ध करुन दिलात. आज महाराष्ट्रातील राजकारणात जो गलिच्छपणा आला आहे त्याला आपण छेद दिलात. गेल्या अनेक दिवसांपासून आपला सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल काटोलच्या जनतेच्या वतीने सुधीरभाऊ आपले मनःपूर्वक आभार!