इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या योजनेसाठी अजूनही महिला अर्ज भरत आहे. पण, या योजनेसाठी अगोदर अर्ज भरलेल्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे. रक्षाबंधनाचे गिफ्ट मिळावे यासाठी ते दोन दिवस अगोदरच देण्यात येणार आहे. १९ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. पण त्याआधीच १७ तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आजच्या मैत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्याचे ३००० रुपये जमा होणार आहेत. या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत. या योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यांना आता मेसेज पाठवले जात आहे. तर ज्यांचे अर्ज नामंजूर झाले आहे. त्यातील अडचणी दूर करुन ते भरले जाणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत हे अर्ज भरावे असे सांगितले जात असले तरी त्यानंतरही हे अर्ज घेतले जाणार आहे.