इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटू विनेश फोगाटने ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस लोपेजचा पराभव करत अंतिम फेरी गाठल्यानंतर आता तीला महिलांच्या ५० किलो वजनाच्या अंतिम फेरीच्या कुस्तीसाठी अपात्र ठरवण्यात आले. स्पर्धेसाठी बाहेर झाल्यानंतर काही मिनिटांतच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन झाल्याने ती बेशुध्द पडली होती. त्यामुळे तात्काळ रुग्णलायात दाखल करण्यात आले.
अपात्रेत वजनांचा मुद्दा
महिला कुस्ती ५० किलो वर्गातून विनेश फोगटला अपात्र ठरवल्याची बातमी भारतीय दलाने शेअर केली. रात्रभर संघाने सर्वोत्तम प्रयत्न करूनही, आज सकाळी तिचे वजन काही ग्रॅम ५० किलोपेक्षा जास्त झाले.भारताला विनेशकडून सुवर्ण पदकाची आशा असतांना ही बातमी धडकली त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. विनेश ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली असतांना वजनांचा मुद्दा तीला अपात्र ठरवण्यासाठी कारणीभूत ठरला.
अशी गाठली होती अंतिम फेरी
विनेशने क्युबाच्या लोपेजला ५-० अशी मात दिली. या सामन्यातील पहिली फेरी खुपच अतितटीची झाली. त्यामुळे कोण आघाडी घेणार अशी स्थिती होती. अखेर विनेशने १-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत विनेशने २-२ गुणांची आघाडी घेत ५-० अशी स्थिती आणली. या स्थितीत क्युबाच्या कुस्तीपटूला कमबॅक करता आले नाही. विनेशने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. पण, तीला आता अपात्र ठरवण्यात आले आहे.