इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं चौथं पदक आता निश्चित झाले आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटने ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस लोपेजचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताला विनेशकडून सुवर्ण पदकाची आशा असणार आहे. विनेश ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची अंतिम फेरी गाठणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली.
विनेशने क्युबाच्या लोपेजला ५-० अशी मात दिली. या सामन्यातील पहिली फेरी खुपच अतितटीची झाली. त्यामुळे कोण आघाडी घेणार अशी स्थिती होती. अखेर विनेशने १-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत विनेशने २-२ गुणांची आघाडी घेत ५-० अशी स्थिती आणली. या स्थितीत क्युबाच्या कुस्तीपटूला कमबॅक करता आले नाही. विनेशने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. विनेशला सुवर्ण की रजत पदक मिळणार याचा निर्णय ७ ऑगस्टला होणार आहे.