नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 14 ऑगस्ट 2024 रोजी अमृत उद्यान ग्रीष्मकालीन वार्षिक कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील.अमृत उद्यान 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 (अंतिम प्रवेश 05:15 वाजता) पर्यंत लोकांसाठी खुले असेल.
हे उद्यान 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रथमच केवळ खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच गतवर्षीप्रमाणे 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी शिक्षकांसाठी ठेवण्यात येणार आहे. अमृत उद्यान देखभालीसाठी दर सोमवारी बंद राहणार आहे. नॉर्थ एव्हेन्यू रोडजवळील राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 35 मधून सर्वसामान्यांसाठी प्रवेश असेल.
उद्यानात प्रवेश आणि स्लॉटचे बुकिंग विनामूल्य आहे. राष्ट्रपती भवनाच्या (https://visit.rashtrapatibhavan.gov.in/) या संकेतस्थळावर तसेच प्रवेशद्वार क्रमांक 35 च्या बाहेर येणाऱ्या आगंतुक अभ्यागतांसाठी ठेवलेल्या स्वयंचलित मशीनद्वारे ऑनलाइन बुकिंग करता येईल.
अभ्यागतांच्या सोयीसाठी, केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन ते गेट क्रमांक 35 (उद्यान प्रवेशद्वार) पर्यंत विनामूल्य शटल बस सेवा देखील उपलब्ध असेल.
अभ्यागत राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालयाला भेट देऊ शकतात, तसेच नवी दिल्लीतील चेंज ऑफ गार्ड सोहळा पाहू शकतात, सिमला येथील राष्ट्रपती निवास मशोबरा आणि हैदराबादमधील राष्ट्रपती निलयम यांना भेट देऊ शकतात, ज्यासाठी त्यांना तुम्ही (https:// visit.rashtrapatibhavan.gov.in/) वर कालावधीची ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
अमृत उद्यान ग्रीष्मकालीन वार्षिक कार्यक्रम, 2024 च्या उद्घाटनावेळी शालेय मुलांसाठी राष्ट्रपती भवन संग्रहालयात प्रवेश विनामूल्य असेल. खेळाडू आणि शिक्षक देखील त्यांच्यासाठीच्या खास दिवशी म्हणजे 29 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्याही शुल्काशिवाय संग्रहालयाला भेट देऊ शकतात.