इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – कोण कसा खर्च करतो हे आपण कधी बघत नाही. पण, आता त्यावर नजर ठेवली जाते. त्यानंतर त्याचा अहवालही तयार केला जातो. त्यातून मोठमोठ्या व्यावसायिक कंपनीना त्याची कार्यपध्दती ठरवण्यास मदत होते. असाच एक अहवाल आता समोर आला असून त्यात भारतीय लोक कशावर जास्त खर्च करता हे दाखवले आहे. भारतीयांच्या खर्चाच्या पद्धतीची माहिती देणारा हा अहवाल जितका बोलका आहे तितका तो आपल्या खर्चावर वॅाच ठेवणारा आहे.
या अहवालात भारतीय लोक सणाला जास्त खरदेी करतात असे दाखवले आहे. त्यात दिवाळीपूर्वी लोक धनत्रयोदशीला भरपूर खरेदी करतात असे म्हटले आहे. तर इतर सणातही खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो.या अहवालानुसार, या सणासुदीच्या हंगामात लोक एसी, फ्रीजपासून ते लक्झरी वाहनांपर्यंत आणि घरासाठी आवश्यक नसलेल्या सर्व गोष्टींवर आपला पैसा खर्च करतात हे म्हटले आहे.
या अहवालात भारतीय कुटुंबांच्या एकूण घरगुती खर्चात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सुमारे ६० टक्के कुटुंबांमध्ये अनावश्यक आणि घरगुती वस्तूंवरील खर्च वाढला आहे. भारतीय लोक काहीही खरेदी करण्यापूर्वी एकदाही विचार करत नाहीत. सर्वात जास्त ब्रँडेड कपडे आणि फॅशनच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. ६७ टक्के लोक फॅशन आणि कपड्यांवर खर्च करतात असे म्हटले आहे.