इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडू नका असा इशारा देत विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे.
त्यांनी सांगितले की, १४ ते २० ऑगस्टदरम्यान सर्व २८८ मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यावेळेस निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय़ २९ ऑगस्टला घेऊ निवडणूक लढवू इच्छिणा-या व्यक्तींनी कागदपत्र तयार ठेवावीत असेही ते म्हणाले.
जरांगे यांनी राज्य सरकाला दिलेल्या या इशारा-यामुळे सर्वच राजकीय पक्षांची अडचण होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीलाही याचा धक्का बसणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष यावर सावध प्रतिक्रियात देत आहे.