पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जून-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या डी.एल.एड. परीक्षेचा निकाल ६ ऑगस्ट रोजी परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळणार असून उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ ऑगस्ट २०२४ असा आहे. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड माध्यमांतून एकूण १७ हजार ३०३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १६ हजार ७८९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित तर ५१४ विद्यार्थी अनुपस्थित होते. एकूण १२ हजार ३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.