येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात करण्यात येत आहे. सदर जन सन्मान यात्रा दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी येवला मतदारसंघात येत आहे. या संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे लाडकी बहीण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महात्मा फुले नाट्यगृह,येवला येथे ३.३० वाजता विणकर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लासलगाव येथे होत असलेल्या लाडकी बहीण संवाद मेळाव्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे महत्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, निफाड पुर्व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, कार्याध्यक्ष द्यानेश्वर शेवाळे, युवक तालुकाध्यक्ष सचिन दरेकर,दत्तात्रय डुकरे पाटील, डॉ.श्रीकांत आवारे,भाऊसाहेब पाटिल बोचरे, विनोद जोशी, बबन शिंदे,दत्तात्रय रायते, शिवाजी सुपनर,राहुल डुंबरे, मधुकर गायकर, भाऊसाहेब जगताप,अशोक नागरे, महीला तालुकाध्यक्ष सुरेखा नागरे, बाळासाहेब रायते, विलास गोरे, धनंजय जोशी, योगेश साबळे, सोहेल मोमीन, माधव जगताप, संजय घायाळ,केदार गायकवाड,संतोष राजोळे,पांडूरंग राऊत, रामकृष्ण दराडे, अनिल सोनवणे,इस्माईल मोमीन,शौकत भाई,चंदू लांडबाले, प्रकाश घोटेकर,निलेश गंभिरे, बनशी जाधव,विष्णू पुंड,भाऊराव दराडे,राजू घोडे, नितीन घोटेकर,भाऊसाहेब गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे होत असलेल्या लाडकी बहीण मेळाव्यास तसेच महात्मा फुले नाट्यगृह,येवला येथे ३.३० वाजता होणाऱ्या विणकर मेळव्यास जास्तीत जास्त महिला, विणकर बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाचे संपर्क प्रमुख बाळासाहेब लोखंडे यांनी केले आहे.