चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्युत लाईनचे काम करीत असतांना मुख्य विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन जोरदार शॉक लागल्याने दोन कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याची धक्का दायक घटना नाशिकच्या चांदवड तालूक्यातील विटावे येथे घडली. सुनिल खुमा वळवी व केवळ सोत्या पाडवी अशा त्यांची नाव असून हे दोघेही नंदूरबार जिल्ह्यातील असून ते विद्युत ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते.
सकाळी विद्युत पोलवर दुरुस्तीचे काम करीत असतांना जवळच्या मुख्य विद्युत वाहिनीचा जोरदार शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चांदवड पोलिसात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.