बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पोलीसात तक्रार केल्याच्या रागातून तीघांवर प्राणघातक हल्ला…आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

by India Darpan
ऑगस्ट 6, 2024 | 3:22 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील लक्ष्मण नगर भागात पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणातून टोळक्याने तीघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत कोयत्याने वार करण्यात आल्याने तीन जण जखमी झाले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चौघाना पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उदय सुनिल चारोस्कर,अंकुश उर्फ पब्या अरूण गायकवाड,बाबू यादव,योगेश प्रकाश यंदे,राहूल शिवाजी शिंदे,खेमकुमार अजय यादव व त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत किरण सुभाष जाधव (रा.राहूलवाडी मच्छाबाजारजवळ,पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे.

या घटनेत किरण जाधव,गौरव रोकडे व आकाश वाघचौरे आदी तिघे जखमी झाले आहेत. जाधव रविवारी (दि.४) रात्री आजारी चुलत भाऊ विजय सखाराम कराटे यास विचारपूस करण्यासाठी लक्ष्मणनगर येथील गायत्री माता मंदिर परिसरात गेले असता ही घटना घडली. दोघे भाऊ गप्पा मारत असतांना उदय चारोस्कर व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी चुलत भाऊ विजय कराटे यास शिवीगाळ करीत तु माझ्या विरूध्द पोलीस ठाण्यात का तक्रार केली याचा जाब विचारला. यावेळी तक्रारदार जाधव व मित्र रोकडे आणि आकाश वाघचौरे यांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला असता संशयित टोळक्याने जमाव जमवून तिघांवर प्राणघातक हल्ला केला.

या हल्यात धारदार कोयत्याचा वापर करण्यात आल्याने तिघे मित्र जखमी झाले असून पोलीसांनी उदय चारोस्कर,योगेश यंदे,राहूल शिंदे व खेमकुमार यादव आदी संशयितांना तात्काळ अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रायकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लाडकी बहीण योजनेवर टीका करणा-यांना अजित पवार यांनी असे दिले उत्तर….

Next Post

नामांकित कंपन्यांमधील ३ हजार पेक्षा अधिक पदांकरिता होणार भरती…या तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

India Darpan

Next Post
IMG 20240806 WA0274

नामांकित कंपन्यांमधील ३ हजार पेक्षा अधिक पदांकरिता होणार भरती…या तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011