इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्त्युत्तर दिले.
ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले. लाडकी बहिण योजना सुरु झाल्यानंतर त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. तर काही माध्यमांमध्ये अर्थ विभागाबाबतही माहिती आली. पण, त्यानंतर अजित पवार यांनी वारंवार खुलासा केला. आताही त्यांनी विधकांना प्रत्त्युत्तर दिले आहे.