नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑनलाईन क्रेडिट कार्ड काढण्याच्या बहाण्याने भामट्यानी एकास सव्वा लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. अन्य कार्डची माहिती मिळवित त्यातून ही रक्कम लांबविण्यात आली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आङे.
श्रीकांत वसंत सारसर (रा.प्रशांतनगर,पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सारसर गेल्या शुक्रवारी (दि.२) डीजीपीनगर भागात राहणा-या आपल्या बहिणी कडे गेले होते. यावेळी त्यांना ८४३९३७२७६५ या नंबरवरून भामट्यांनी संपर्क साधला होता. पंजाब नॅशन बँकेचे क्रेडिट कार्ड घेण्याबाबत माहिती देवून संबधीतांनी सारसर यांच्या कडे असलेल्या क्रेडिट कार्डची माहिती मिळून ही फसवणुक केली.
यस बँक आणि इंडियन ओवरसेस या बँकाच्या क्रेडिटकार्ड मधून खरेदीचा बहाणा करून भामट्यांनी १ लाख १८ हजार ३२९ रूपयांची फसवणुक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.