इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे शहरात २४ आणि २५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीपात्राजवळील घरांना त्याचा मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या धरणाची क्षमता, खोली, विसर्ग करण्याची पध्दत हे समजून घेतले, तसेच विसर्ग करण्याचा निर्णय कसा घेतला जातो. तसेच धरणाची क्षमता वाढवण्यासाठी नक्की काय उपाययोजना कराव्या लागतील ते जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. तसेच पुराचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.