नाशिक (इंडिया दर्पण वृत्तेसवा) – देवळाली विधान सभा मतदार संघात २६ गावांमध्ये रेशनकार्ड कॅम्प भाजपच्या इच्छुक उमेदवार व निवृत्ती तहसिलदार डॅा. राजश्री अहिरराव यांनी घेतल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांचा पारा चढला आहे. त्यांनी थेट नाशिक तहसीलदार कार्यालयात जाऊन अहिरराव बाई घेत असलेल्या रेशन कार्ड कॅम्पची कामे करु नका असे धमकावले. त्यामुळे डॅा. अहिरराव यांनी आमदार मॅडम आपली दादागीरी खपवुन घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे.
त्यांनी एक निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, मी सन २०१५-२०१८ या कालावधीत तहसीलदार नाशिक या पदावर कार्यरत असताना जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न रेशन कार्ड. तालुक्यातील प्रत्येक गावात मी स्वतः व टीम प्रत्यक्ष जाऊन सुमारे २०,००० रेशन कार्ड नविन बदलुन दिले. परंतु गेल्या ५-६ वर्षात शेतकरी व रोजंदारी वर काम करणा-या कष्टकरी जनतेची रेशन कार्डची कामे झाली नाहीत. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची महिला कल्याणकारी योजनेसाठी रेशनकार्ड अवश्यक असल्याने नाशिक तालुक्यातुन रेशन कार्ड मधील नाव कमी जास्त करणे, १२ अंकी नंबर, नाव ॲानलाईन करणे, जुने हरवलेले रेशन कार्ड बदलुन देणे, नविन विभक्त रेशनकार्ड ही सगळी कामे मोठ्या प्रमाणावर झालेली नाहीत, मला रोज या बाबत विचारणा होत होती म्हणुन मी स्वतः व माझ्या टीमने रेशन कार्ड शिबीर घेण्याचे ठरविले व आज पर्यंत २६ गावामध्ये कॅम्प घेतले आहेत
गेले महिनाभरापासुन नाशिक तालुक्यातील २६ गावांमध्ये रेशनकार्ड कॅम्प मी स्वतः व माझी टीम घेत आहोत . देवरगाव २)पळसे ३)वाल्मिकनगर४)पिंप्रिसय्यद५)जाखोरी ६)दहेगाव७)राहुरी ८)जातेगाव ९)भगुर १०)कॅम्प ११)पिंपळगाव खांब १२)गाळोशीपाडा १३)धोंडेगाव १४) साडगाव १५)नाणेगाव १६)शेवगेदारणा १७)कोटमगाव १८)हिंगणवेढे १९)शिंदे २०)चांदगिरी २१)कोटमगाव२२)हिंगणवेढ २३)विहीतगाव २४. एकलहरा २५. मोहगाव २६. सुभाषनगर या सर्व गावांमध्ये प्रचंड प्रतिसाद लाभला.
परंतु आज देवळाली मतदार संघाच्या आमदार सौ सरोज अहिरे वाघ यांनी तहसीलदार नाशिक व त्यांचा स्टाफ यांना ॲाफीस मध्ये जाऊन “ अहिरराव बाई घेत असलेल्या रेशन कार्ड कॅम्प ची कामे करु नका असे धमकावले. आमदार मॅडम माझ्या कॅम्प मध्ये अडथळा आणुन सर्वसामान्य गोरगरिब जनतेची कामे तुम्ही थांबवली आहेत , तुम्हाला जनतेने त्यांचे बहुमुल्य मत देवुन कामे करण्याकरिता निवडुन दिलेले आहे , मात्र तुम्ही त्यांची कामे थांबवुन चांगलेच पांग फेडले आपल्याला हे शोभा देत नाही.
मी तहसीलदार पदावर असताना तुम्ही मला खुप त्रास दिला हे उभा महाराष्ट्र जाणतो, मी त्रास सहन केला. परंतु गोरगरिब जनतेला तुम्ही अश्या प्रकारे त्रास दिलेला जनता खपवुन घेणार नाही, गोरगरिब गरजु कष्टकरी जनतेची कामे ही निशुल्क होत आहेत त्यात तुम्ही खोळंबा घालत आहात ,हे शोभनीय नाही याच उत्तर तुम्हाला जनता दिल्या शिवाय राहणार नाही. आपल्या मध्ये धमक असेल, नॅालेज असेल तर आपणही कॅम्प घ्या पण गोरगरिब गरजु जनतेला लाभापासुन वंचीत करु नका ही आपल्याला हात जोडुन विनंती आहे.