इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढवणार असून मुंबईतील सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आज आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष प्रीति शर्मा मेनन यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. तळागाळात प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
भाजप हा महाराष्ट्रविरोधी आणि मुंबईविरोधी पक्ष आहे; बनावट सरकारला जनकल्याणासाठी वेळ नाही, ते सरकारी तिजोरीची संघटित लूट करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आम आदमी पक्षाने आज केली.
मुंबईतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आम आदमी पार्टी मुंबईतील सर्व ३६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. उर्वरित महाराष्ट्रातील आमचे सहकारी आणि कार्यकर्ते पूर्ण तयारीत असून तयारी जोरात सुरू आहे.