इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वर्धा : आमदार रणजित कांबळे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ध्यातील देवळी तालुक्यातील सोनेगाव येथे ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव यांना आ. कांबळे यांनी मारहाण केली होती. गावातील एका भूमिपूजन कार्यक्रमावेळी सातव यांनी आ. कांबळे यांना ग्रामपंचायतीच्या सदस्याने रखडलेल्या कामांविषयी विचारणा केली होती. तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले, तरीही अद्याप काम सुरू झाले नसल्याबाबत त्याने नाराजी व्यक्त करताच आ. कांबळे यांनी त्यांना मारहाण केली.
सातव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. देवळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आ. कांबळे काँग्रेसचे आहेत. त्यांनी मारहाण केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली. या घटनेनंतरही आमदारांवर कारवाई होत नसल्याने भाजपने पत्रकार परिषद घेत कारवाईची मागणी केली. ग्रामपंचायत सदस्यात मारहाण करणे अयोग्य आहे.
आ. कांबळे यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी केली आहे. आ. कांबळे यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा, त्यांना गावबंदी करू, असा इशारा भाजप नेते राजेश बकाणे यांनी दिला होता. आ. कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला, तरी त्यांनी याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.