इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केरळातील वायनाड जिल्ह्यातील मुंदकाई या गावात दरड कोसळली. यामुळे येथे मोठी जिवितहानी झाली आहे. या घटनेत मदत आणि बचावकार्य करताना लष्कराला मोठी अडचण येत आहे. या संकटाच्या काळात मद्रास सॅपियर्समध्ये तैनात असणाऱ्या मेजर सीता शेळके यांनी अपार कौशल्य आणि शौर्य दाखवित आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत मुंदकाई ते चूरमला दरम्यान अवघ्या १६ तासांत बेली ब्रीज बांधला.
हे काम झाल्यामुळे लष्कराची मदतकार्य करणारी तुकडी घटनास्थळी पोहोचू शकली. या तुकडीने वेगाने केलेल्या मदतकार्यामुळे अनेक प्राण वाचू शकले. मेजर सीता शेळके या आपल्या नगर दक्षिणच्या आणि विशेषतः पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथील आहेत. आपल्या मातीत जन्मलेल्या या आपल्या लेकीने केरळ येथे दाखविलेले हे प्रसंगावधान, शौर्य आणि धैर्य आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
मेजर सीता शेळके तुम्ही आमच्यासाठी अनमोल आहात. तुमच्या कार्यास माझा सॅल्युट . असे सांगत खासदार निलेश लंके यांनी कौतुक केले आहे.