इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बांग्लादेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी ढाका सोडले आहे. वादग्रस्त कोटा पध्दती विरोधात गेल्या महिन्याभरापासून येथे आंदोलन सुरु आहे. पण, रविवारी भीषण चकमकींमध्ये तब्बल १०० लोक मारल्यानंतर वातावरण चिखळले आहे. आतापर्यंत या आंदोलनामुळे ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
या राजीनामान्यानंतर देशातील सत्ता लष्कराने ताब्यात घेतली आहे. आता बांगलादेशचे लष्करप्रमुख वाकर-उझ-झमान राष्ट्राला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान शेख हसिना यांना जनतेच्या भावनांचा विचार करुन राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर काही मिनिटात शेख हसीना यांनी राजीनामा दिला.
१५ वर्षांच्या राजवटीच्या सर्वात वाईट काळ हा ठरला आहे. देशात अशांतता वाढली आहे. संपूर्ण बांगलादेशात निदर्शने व्यापक झाली असून सरकारविरोधी चळवळ वाढली आहे. लोकांच्या पाठिंब्याचे आवाहन करणारी गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.