नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडनेर नाशिकरोड मार्गावरील विहीतगाव परिसरात धावत्या सायकलवरून पडल्याने ३७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र दत्तात्रेय काळे (रा.लोहारगल्ली,विठ्ठल मंदिराजवळ देवळाली गाव) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. काळे रविवारी (दि.४) दुपारच्या सुमारास वडनेरकडून नाशिकरोडच्या दिशने सायकलवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.
विहीतगाव सर्कल परिसरात ते धावत्या सायकलवरून तोल जावून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने तातडीने त्यांना बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.