इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लाडकी बहिण योजने विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या योजनेचा पहिला हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
या याचिकेत पहिला हप्ता थांबवण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने फेटाळली आहे. यावेळी न्यायालयाने म्हटले की, कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही. फी आणि कर यात फरक आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारने बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय़ आहे. त्याला आव्हान कसं देता येईल असेही असे म्हटले आहे. नवी मुंबईतील सीए नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकार आता पाहिला हप्ता वितरीत करु शकणार आहे.