गौतम संचेती, इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा जातील हे जवळपास निश्चित आहे. त्यात एखाद्या दोन मतदार संघात फक्त बदल होऊ शकतो. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात महायुती व महाविकास आघाडी अशी लढत झाल्यात सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार असून ती संख्या ७ आहे तर शिवसेना ठाकरे गटाकडे सहा जागा जाऊ शकतात. तर त्या खालोखाल भाजपला ५, काँग्रेसला ४, राष्ट्रवादी शरद पवार गटाला ४, शिंदे गटाला ३ व माकपला १ जागा मिळणार आहे.
महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाला नाशिक पश्चिम, देवळाली, नांदगाव, निफाड, सिन्नर, मालेगाव बाह्य तर काँग्रेसला नाशिक मध्य, चांदवड, मालेगाव व इगतुरीची जागा मिळू शकते. राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाशिक पूर्व, दिंडोरी, येवला व सटाण्याची जागा मिळू शकते. तर कळवणची जागा माकपला जाऊ शकते.
महायुती भाजपला नाशिक मध्य, पश्चिम, पूर्व व सटाणा व चांदवड हे मतदार संघ मिळणार आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला येवला, निफाड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, मालेगाव, देवळाली मिळेल. तर शिंदे गटाला मालेगाव बाह्य, नांदगाव व इगतपुरी विधानसभा मतदार संघ मिळू शकेल.
एकुण जागा १५
महायुती – राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे ७, भाजप – ५, शिंदे गट – ३
महाविकास आघाडी – ठाकरे गट ६, काँग्रेस ४, शरद पवार गट ४, माकप १
विधानसभा मतदार संघनिहाय अशी होईल लढत
नाशिक मध्य – भाजप – काँग्रेस
नाशिक पश्चिम – भाजप – शिवसेना ठाकरे गट
नाशिक पूर्व – भाजप – राष्ट्रवादी शरद पवार गट
देवळाली – राष्ट्रवादी अजित पवार गट – शिवसेना ठाकरे गट
…
नांदगाव – शिवसेना शिंदे गट – शिवसेना ठाकरे गट
इगतपुरी – शिवसेना शिंदे गट – काँग्रेस
मालेगाव बाह्य – शिवसेना शिंदे गट – शिवसेना ठाकरे गट
सिन्नर – राष्ट्रवादी अजित पवार गट – शिवसेना ठाकरे गट
निफाड – राष्ट्रवादी अजित पवार गट – शिवसेना ठाकरे गट
येवला – राष्ट्रवादी अजित पवार गट – राष्ट्रवादी शरद पवार गट
मालेगाव मध्य – राष्ट्रवादी अजित पवार गट – काँग्रेस
दिंडोरी – राष्ट्रवादी अजित पवार गट – राष्ट्रवादी शरद पवार गट
कळवण – राष्ट्रवादी अजित पवार गट – माकप
चांदवड – भाजप – काँग्रेस
सटाणा – भाजप – राष्ट्रवादी शरद पवार गट