नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील हयात हॉटेल जवळ भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३५ वर्षीय पादचारी ठार झाला. सदर व्यक्ती रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
श्याम कैलास नाटेकर (३५ रा.कोळीवाडा,शनिचौक सातपूर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाटेकर हे रविवारी (दि.४) रात्री आठ वाजेच्या सुमारास त्र्यंबकरोडने पायी जात होते. हयात हॉटेल परिसरात जीवन ज्योत हॉस्पिटल समोर ते रस्ता ओलांडत असतांना नाशिककडून त्र्यंबकच्या दिशेने भरधाव जाणा-या अज्ञात चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात गंभीर झाल्याने मामा विजय बेंडकुळे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक धनराज गावीत करीत आहेत.