इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
श्रीहरिकोटाः भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ यांनी माजी प्रमुख के सिवन यांच्यावर त्यांच्या आत्मचरित्र ‘निलावू कुडीचा सिंहगल’ (चंद्र प्यायलेल्या सिंह) मध्ये खळबळजनक आरोप केले. त्यांनी सिवन यांच्यावर ‘इस्रो’ प्रमुख होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करताना, चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशामागे एक नाही तर पाच कारणे असल्याचा दावाही त्यांनी केला. हे घाईघाईने लाँच केले गेले. त्यामुळे मिशन अयशस्वी झाल्याचे म्हटले त्यामुळे वाद वाढला व त्यानंतर हे आत्मचरित्र मागे घेण्यात आले.
मनोरमाने पुस्तकाचा हवाला देत एक लेख प्रकाशित केला आहे. त्यात हे सर्व दावे करण्यात आले आहेत; मात्र वाद वाढल्यानंतर ‘इस्रो’चे प्रमुख सोमनाथ यांनी आत्मचरित्र प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इस्रो’चे प्रमुख सोमनाथ यांनी त्यांच्या पुस्तकात चांद्रयान २ मोहीम अयशस्वी झाल्याचा दावा केला होता. आवश्यक चाचण्या न करता घाईघाईत ते प्रक्षेपित करण्यात आले होते.
सोमनाथ म्हणतात, की तपास समितीला चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशाची पाच मुख्य कारणे सापडली आहेत. सॉफ्टवेअरमधील त्रुटी आणि इंजिनच्या इलेक्ट्रॉनिक्स असेंब्लीमधील खराबीमुळे समस्या उद्भवल्या. याव्यतिरिक्त, चुकीच्या अल्गोरिदममुळे इंजिनचा जोर अपेक्षेपेक्षा जास्त होता. याशिवाय अनेक आवश्यक तपासही झाले नसल्याचा दावाही सोमनाथ यांनी केला आहे. चांद्रयान ३ मोहिमेच्या यशात या निष्कर्षांचे योगदान असल्याचे त्यांनी मान्य केले.