इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने श्रीलंकेबरोबरचा दुसरा सामना ३२ धावांनी गमावला. भारतीय संघाला श्रीलंकेने दिलेल्या २४१ धावांचे आव्हान भारतीय संघाला पार करता आले नाही. भारतीय संघ २०८ धावातच गारद झाला. या विजयामुळे श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे
रोहित शर्मा ६४ तर शुबमन गिल ३५ धावा केल्या. विराट कोहली १४, श्रेयस अय्यर ७, केएल राहुल ०, शिवम दुबे ०, वॉशिंग्टन सुंदर १५ तर अक्षर पटेलने ४४ धावा केल्या.
श्रीलंका संघाचा जेनिथ लियानागे ६ विकेट घेत भारतीय संघाचा निम्मा संघ गारद केला. तर तीन विकेट श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असालंका याने घेतल्या. श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने दमदार सुरूवात केली होती. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी ९७ धावांची सलामी दिली होती. तरीही टीम इंडियाला २४० धावा करता आल्या नाहीत.
रोहित शर्मा मैदानावर असताना सामना एकतर्फी वाटत होता, मात्र तो आऊट झाल्यावर परत एकदा बाकी सर्वच फलंदाजांनी श्रीलंकेच्या बॉलर्ससमोर नांगी टाकल्याचं दिसून आले.