नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पावसाचा जोर आज ४ ऑगस्ट रोजी दुपारी वाढला असल्यामुळे व गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे व तो टप्प्याटप्प्याने वाढणार असल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे.पूर बघण्यासाठी नागरिकांनी नदीकिनारी गर्दी करू नये.
कुठलाही धोका पत्करू नये. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 02532571872 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त तथा आपत्कालीन विभाग प्रमुख स्मिता झगडे यांनी केले आहे.