निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील चांदोरी, सायखेडा व गोदाकाठ परिसरात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थिती संदर्भात प्रांत हेमांगी पाटील ,तहसीलदार विशालजी नाईकवाडे, सरपंच विनायक खरात, माजी सरपंच संदीप टर्ले, पोलीस पाटील अनिल पाटील गडाख, सायखेडा पोलीस स्टेशन, महावितरण, जलसंपदा खाते व आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आपत्कालीन बैठक घेऊन पुरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी चांदोरी व सायखेडा पुलाची पाहणी करून जलसंपदा खात्यास पानवेलीसंदर्भात योग्य ते आदेश देण्यात आले, तसेच प्रशासनातर्फे व चांदोरी ग्रामपालिकेतर्फे नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
गोदावरी नदीला आज दुपारी १ वाजता ४५ हजार व्यूसेने पाणी सोडलेले आहे आज धरण क्षेत्रात पाऊस चालू आहे. पाणी पातळीत रात्री उशिरा पर्यंत ५ हजार व्यूसेस पर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळे नदी काठावरील सर्व संबंधित असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.