नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावासामुळे धरणाच्या पाण्यासाठ्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा पाणीसाठा ८० टक्के झाला आहे. या धरणातून दुपारी १२ वाजता ५०० व्यूसेस तर ३ वाजता १००० व्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील या पावसामुळे नदी, नाले दुधडी भरुन वाहत आहे. चांदोरी गावात पावासाचे पाणी साचले आहे. इगतपुरी येथील भाम धरणातून सोडलेल्या अतिरिक्त विसर्गामुळे नाल्याचे व नदीचे पाणी मौजे काळुसते ता इगतपुरी येथील घरांमध्ये शिरले आहे, पाच ते सहा कुटुंबे व अंदाजे २० ते २२ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे (खबरदारीचा उपाय म्हणून)अशी प्राथमिक माहिती तहसीलदार इगतपुरी यांनी दिली आहे. इगतपुरी, मौजे कानडवाडी येथील भीमा काळू पडवळे यांच्या राहत्या घराची भिंत पहाटे पडली असून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. तर शनिवारी रात्री ठीक ८.१५ वाजेच्या सुमारास सुरगाणा तालुक्यातील मौजे.चिचंदा ( गहाले )येथील श्रीमती मंगला अमृत बागुल या नदी पार करत असताना नदीला अचानक जोरात आलेल्या पुरामुळे प्रवाहात वाहून गेल्या. आज सकाळी वेळ ७.३० च्या दरम्यान मृत्यूदेह नदीकाठी आढळून आला आहे.
जिल्ह्यातील धरणातून इतक्या क्यूसेसने विसर्ग सुरु आहे.
भावली – १२१८
कडवा- ८२९८
भाम – ४३७०
पालखेड – ५५७०
गंगापूर – ५००