नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पालखेड धरण ८० टक्के भरल्याने धरणातून २३४३ क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग कादवा नदी पात्रात सोडण्यात आले. नदी काठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पालखेड धरणातील पाण्यावर मनमाड, येवला, निफाड आवर्तन सोडण्यात येते त्यामुळे पूर पाणी पालखेड डाव्या कालव्यातून सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे.