मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मध्यरात्री दोन तरुणांना मध्ये पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून शुभम देविदास पगारे याचा खून झाला आहे. तर त्याला मारहाण करणारा दादू नामक तरुण सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. शुभम पगारे हा माजी नगरसेविका नूतन पगारे यांचा मुलगा आहे. किरकोळ वादातून या दोघांनी एकमेकांवर धारदार हत्याराने वार केले. त्यात शुभम याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मनमाड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोघेही राहत असलेल्या परिसरात बंदोबस्त लावला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
 
			








