मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शरद पवार यांनी सपत्नीक भेट दिली. राज्य सरकारकडील साखर कारखान्यांची प्रलंबित थकहमी प्रकरणे तसेच मागील भेटीवेळी चर्चेत घेतलेले प्रलंबित प्रश्न यांच्या निपटऱ्यासाठी ही भेट उपयुक्त ठरली असे शरद पवार म्हणाले.
सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर शरद पवार भेटीला गेले. या भेटीत मराठा आरक्षणाबाबतही चर्चा झाल्याचे बोलले जाते.