नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे: “राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
राज्यपालाच्या दोन दिवसीय परिषद
राज्यपालाच्या दोन दिवसीय परिषदेचा आज ३ ऑगस्ट रोजी समारोप झाला. या परिषदेसाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे दिल्लीत आले होते. या परिषदेचा समारोप झाल्यानंतर ही भेट घेण्यात आली. या परिषदेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थितीत होते.