इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गोंदिया येथील बिरसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले व भाजपचे मोठे नेते अनभिज्ञ होते. पण, या भेटीत त्यांनी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एकांकात चर्चा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीत मोदी यांनी पटेल यांच्याबरोबर काय चर्चा केली. याचा तपशील समोर आला नसला तरी राज्यातील एकुण परिस्थितीचा आढावा घेतल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे या दौ-याबाबात सुरक्षेच्या कारणांमुळे या दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. या वेळी भाजपचे खासदार सुनील मेंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानतंर मोदी व पटेल यांच्या वन टु वन चर्चा झाली. त्यामुळे या चर्चेची चर्चा आता होऊ लागली आहे.
मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत हा दौरा होता. या राज्यातील शिवणी येथे विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होती. त्याअगोदरच मोदी यांनी गोंदियातील बिरसी विमानतळावर खासदार सुनील मेंढे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान सर्वप्रथम खासदार मेंढे यांच्याबरोबर बोलले. त्यानंतर त्यांनी खासदार पटेल यांच्याशी एकांतात चर्चा केली. त्यानंतर या तीनही नेत्यांनी आपसात चर्चा केली. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा शिवणीकडे रवाना झाला.
शिवणीतील सभा आटोपल्यानंतर मोदी यांचे विशेष विमान बिरसीहून दिल्लीकडे रवाना झाले. विशेष म्हणजे भाजपचे मोठे नेते या दौऱ्याबद्दल अनभिज्ञ होते. पंतप्रधान कार्यालयाकडूनच तशा सूचना असल्याचे सांगण्यात येत आहे.