नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकच्या विविध औद्योगिक प्रश्नांबरोबरच, प्रस्तावित रिंग रोड,नासिक मुंबई रोड बाबत कायमस्वरूपी तोडगा, नासिक पुणे रोड तू घातलेली सेमी हाय स्पीड नाशिक पुणे रेल्वे या प्रमुख मुद्द्यांसमवेतच नाशिकच्या उद्योजकांच्या विविध अडचणी व अनेक प्रलंबित प्रश्नां आहेत त्या दृष्टिकोनातून आपण नाशिक पुढाकार घेऊन नासिकचे पालकमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला बैठक लावावी अशी आग्रही मागणी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आज झालेल्या बैठकीत केली.
गेल्या अनेक वर्षापासून निमा मार्फत नाशिक मध्ये मोठ्या उद्योगाच्या गुंतवणूकीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे परंतु महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक जाहीर होत असताना नाशिकला मात्र कुठलीच गुंतवणूक होत नाही हे श्री बेळे यांनी महाजन यांच्या लक्षात आणून दिले व याकरता आपण आग्रही भूमिका घ्यावी आणि नाशिकला येणाऱ्या काळामध्ये मोठी गुंतवणूक आणण्याकरता पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
उद्योगांशी संबंधित इतरही अनेक प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे नाशिकला जाहीर झालेल्या नवीन औद्योगिक वसाहतीची प्रक्रिया तातडीने करून भूखंड उद्योजकांना उपलब्ध करून देण्याची मागणी करत असतानाच ग्रामीण भागातील काही खाजगी औद्योगिक वसाहती मधील मूलभूत सुविधा आपल्या ग्रामविकास खात्यामार्फत जिल्हा परिषदेला सांगून करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले,
याचबरोबर नाशिक ला प्रस्तावित रिंग रोड हा 60 मीटरचा न करता 90 मीटरचा करावा अशी ही मागणी याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे केली
आपल्याकडे पर्यटन खाते देखील असल्यामुळे पर्यटन खात्याच्या मार्फत पर्यटन वाढीकरता विशेष लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचेही त्यांना सांगितले, आपणच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रमुख समितीचे अध्यक्ष आहात या निमित्ताने अनेक विषय मार्गी लावणे गरजेचे आहे ते तातडीने मार्गी लावावे. बैठकीमधील चर्चेमध्ये महाराष्ट्र चेंबरचे संजय सोनवणे,श्री राजाराम सांगळे, निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कैलास सोनवणे,नितीन आव्हाड, कैलास पाटील,मनीष रावल यांनी विषय मांडत सहभाग घेतला,
ना. गिरीश महाजन यांनी बोलताना आपल्या मागण्या अत्यंत रास्ता असून याबाबत मी आग्रही भूमिका राज्य शासनाच्या उद्योग मंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे मांडेलच व येणाऱ्या काळात आपली बैठक लवकरात लवकर आयोजित करून माझ्या खात्याशी संबंधित तसेच उद्योग खाते व राज्य शासनाकडील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली, आज नाशिक मधील उद्योगांना शनिवारची सार्वजनिक सुट्टी असून सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुद्दे मांडले यातूनच आपली तळमळ लक्षात येते असेही त्यांनी यावेळेस नमूद केले
कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकमध्ये मोठा निधी येणार असून त्यामधूनही आपण सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच मूलभूत सेवांसाठीचे कामे सुद्धा मार्गी लावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. नासिक मधील सर्वसामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, व सर्व संघटनांची सुद्धा कुंभमेळा च्या आयोजनाच्या दृष्टीने बैठक आयोजित करून सूचना घेण्या चे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी यावेळेस नमूद केले. बैठकीला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सीमाताई हिरे, शशिकांत जाधव, हेही उपस्तित होते
आजच्या झालेल्या बैठकीस आयमाचे अध्यक्ष ललित बुब, तसेच,प्रमोद वाघ, सतीश कोठारी ,हर्षद बेळे, नरेंद्र शाळीग्राम,देवेंद्र विभुते, विराज गडकरी, नितीन साळुंखे, सुधीर बडगुजर, किरण वाजे,किरण खाबिया, निपमचे प्रकाश गुंजाळ, सचिन कंकरेज, यांच्यासह शंभरहून अधिक उद्योजक उपस्थित होते