इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः ग्रामपंचायत निवडणुकीच्या आज रणधुमाळीत मतदान चालू असतानाच पाथर्डी तालुक्यातील करंजीमध्ये मतदानानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कंरजी येथील सुनील गांधी हे मतदानासाठी केंद्रात गेले. त्यावेळस ही दुर्दैवी घटना घडली.
गांधी यांनी अगोदर मतदान केले. त्यानंतर ते मतदान कक्षाच्याबाहेर पडताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गांधी हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यात त्यांना हा हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी वाद झाले. तर काही ठिकाणी दोन गट भिडल्याच्या घटना आहे. त्यात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची ही घटना घडली आहे.